"सन्मान"
...हम्म नाव तर छान आहे,
पण सलमान असते
तर अजून भारी
वाटले असते.....हूड
हूड दबंग दबंग
च चालू केले
असते.. दोन्ही हात
कमरेवर ठेवून, गेट
च्या बाहेर ती
उभी होती.... black colour चा
T - Shirt, faint blue colour ची
3 /4 th jeans ....डोळ्यावर मोठ्ठा goggle ...पाठीवर मोठी
sack आणि शेजारी ठेवलेली
अजून एक कपड्यांची
bag .... ती नुकतीच taxi मधून उतरली
होती....घरात शिरण्यापूर्वी
तिचे पहिले लक्ष्य
घराच्या नावाकडे गेले
आणि दुसरे लक्ष्य
gate वर लावलेल्या पाटीवर...."
घरामध्ये कुत्रा आहे...सावधान ....बेल दाबूनच
आत यावे, म्हणजे
आम्ही कुत्र्याला आधी
बांधून ठेवू..ऐकायचे
नसेलच तर जरूर आत यावे....१४ injection चा खर्च दयायची जबाबदारी
आमची नाही..."....हा
हा हा हा हा....तिने
डोक्यावर दोन्ही हात ठेवले...हायला, आता
पर्येंत मी पुणेरी
पाट्यांबद्दल नुसते वाचले
होते...आज मात्र
पहिल्यांदा पहिले....तिने पटकन
३-४ poses देऊन
सेल्फी काढले आणि
facebook वर पोस्ट सुद्धा
केले.....१ मिनिटामध्ये
त्याला ५० likes आणि
8 कंमेंट्स आल्या...
सुरवातच १४ injection नि करण्यापेक्षा
बेल वाजवावी....असा
विचार करत असताना
तिने नकळत gate उघडले
आणि काय भो भो भो
भो अश्या आवाजाने
पूर्ण घर दणाणून
उठले.....आणि एक
brown केसाळ कुत्रा जोरात
तिच्या दिशेने पळत
आला.... हायला, ही
काय मुसीबत आहे
यार....म्हणजे ह्या
कुत्र्याच्या कानाला काय
sensor वैगरे लावला आहे
कि काय... जरा
gate वाजले
कि sensor activate होतात आणि
हा पळायला लागतो......
भाआआआअ गॊऒऒऒ असा
म्हणत ती किंचाळत
पळायला लागली....पण
कुठे पळावे लक्ष्यात नाही
आल्याने ती बंगल्याच्या
आत शिरली आणि
अंगणाभोवती पाळायला लागली....१
round ....२ round ...३ round ...४ round ....ती
पुढे तो कुत्रा
मागे.... पळतच होते...."अरे वाचायला
या कि कोणीतरी,
लोक आहेत का नाही घरात
का फक्त हे कुत्रं च
आहे....वाचवा...वाचवा
" ती ओरडायला लागली....आता
५वि round होणार तेवढ्यात
तो कुत्रं समोर
येउन उभा राहिला....हायला, ह्याला
म्हणजे घरचे सगळे
short -cuts माहिती आहेत तर...तिने जीभ
चावली....आता काय
खरं नाही...काकांनी खरं लिहिलंय
पाटीवर.....तिला ती
१४ injections घेत आहे
आणि ओरडत आहे,
असे चित्र डोळ्यासमोर
आले... आणि ती आआआ करून
ओरडायला लागली.....तेवढ्यात
समोरून पायजमा आणि
बनियन घातलेले साधारण
५० एक वयाचे
काका तिच्या समोर
येउन ठाकले...."मोहना..
अरे नको चावूस....जाऊदे सोड
तिला... एवढी मोठी
पाटीलिहिलीये gate वर तरी
ह्या डोळस माणसांना
काही दिसेनासे झालेय...डोळे फुटलेत
वाटते"... असे म्हणत
त्यांनी तिच्या goggle कडे
पहिले....तिने पटकन
goggle डोळ्यावरून काढून टाकला....
" हम्म आता gate भर मोठी
pati लावतो..म्हणजे आंधळ्याला
पण वाचता येईल...चल चल
बेटा, आत जा..."
तो so called कुत्रा
I mean मोहन....हो मोहन
च ...अगदी आज्ञाधारक
बालकाप्रमाणे आत निघून
गेला....जसे कि काही घडलेच
नाही... ह्या कुत्र्याला
माझी भाषा का कळली नाही
मग...एवढी बोंबलत
होते मी कधीपासून....जीव गेला
माझा... कपाळावरचा घाम
पुसत ती तिथेच
मटकन बसली.... डोळ्यावरचा
चष्मा खाली करून
तिच्याकडे पाहत काकांनी
मान डोलावली..." अग
ए, ऐकतेस का....जरा पाणी
आण बाहेर..." त्या
काकांनी काकूंना हाक
मारली... " अग बाई,
काय झाला हो....चक्कर वैगरे
तर नाही आली
ना...तरी आजकाल
मी तुम्हाला सांगत असते
कि जरा दगदग
कमी करा, BP चा त्रास
आहे ना तुम्हाला...आणि हा
मोहन का ओरडत होता..." एका वेळी
खूप साऱ्या प्रश्नांची
सरबत्ती करत काकू
पाणी घेऊन बाहेर
आल्या.... तिच्या प्रश्नांची
सवय च असल्यासारखे
शांत भाव काकांच्या
चेहऱ्यावर होते.. त्या
परिस्थिती मध्ये सुद्धा तिला जाम हसायला येत
होते...पुणेरी माणसं
जाम बडबडी असतात...हम्म हा
पण अनुभव आला तर....
“अग आधी तिला
पाणी दे.....मग
देतो तुझ्या सगळ्या प्रश्नांची सगळी
उत्तरं”....काकू एकदा
तिच्याकडे एकदा त्यांच्याकडे...असा बघत
होत्या...२ मिनिटांनी
त्यांना सुधारल्यावर त्यांनी
तिला पाणी दिले....तिने मोठ्ठी
smile काकूंना दिली आणि
घटाघटा पाणी पिउन
टाकले..."अग अग
सावकाश, ठसका लागेल
ना.." काकू म्हणाल्या...
वाह, म्हणजे पुणेरी
प्रेम पण बघायला
मिळाले तर...ती हसली...."काकू अजून
पाणी..."..." हो आणते
हां !!!" ...म्हणत त्या
आत गेल्या... कोण
कुठली मुलगी, माहिती
नाही तरी आपुलकीने
वागणाऱ्या त्या काकू
तिला जाम भारी
वाटल्या...
काकू लगबगीने आत गेल्या...."
हम्म कोण गं तू?, माझ्याकडे
काय काम ?" ....काकांनी
तिच्याकडे बघून विचारले...
" आ हा ...मी
ना...मी... मी... मी...जीवना....म्हणजे माझे
नाव जीवना...मी
ना.."... तिला मधेच
तोडून ते म्हणाले,
" कळलं मला तु
जीवना म्हणजेच तुझे
नाव जीवना.."...काकांनी
weird लूक दिला....आता काय तिला हसू
आवरले नाही आणि
ती पोट धरून
हसायला लागली.....गडाबडा
लोळलीच...." काका तुम्ही
बेस्ट आहात...मला
जाम आवडलात..." ती
म्हणाली आणि टाळीसाठी
हाथ पुढे केला.....
" बास बास..." काकांनी हातवारे
केले,...."पुढे"...असा हाताने
च खुणावले.....ती
आता जरा सावरली
आणि म्हणाली..." अहो
काका, मी पुरुषोत्तमांची
मुलगी... पुरुषोत्तम तुमचा
college मधला मित्र.... म्हणजेच पुऱ्या
...पुऱ्या म्हणायचा तुम्ही त्याला…
कॉलेज मध्ये सगळे
तुम्हा दोघांना मक्याच्या पुऱ्या
म्हणून चिडवायचे.... तुम्ही
मकरंद आणि बाबा
पुरुषोत्तम... हे हे
हे ..आणि तुम्ही
दोघे जण नाही का
एकाच मुलीवर line मारायचा
पण तिने तुम्हाला
दोघांना भाव दिला
नाही आणि तिसऱ्यासोबतच
पळून गेली...आणि..
" अग बास बास...."
काकांनी तिच्या जवळ
जाऊन तिच्या तोंडावर
हाथ ठेवला...आणि
तिला गप्पं बसवले....नंतर हळूच
आजूबाजूला काकू नाहीत
ना, ह्याचा अंदाज
घेतला....त्या नाहीयेत
हे बघून हळूच
कपाळावरचा घाम पुसला....
जीवना मात्रं भोळा
भाबडा चेहेरा करून
गालावर बोट लावून
विचार करायला लागली..तिला
अजूनही कळतं नव्हते,
असा मी काय बोलले कि
काका घाबरले... umm..
काकू पाण्याचा ग्लास घेऊन
आल्या...आणि तिला
दिला...."काय हो
काय बोलत होता...college
आणि मुलगी असा
काहीतरी मला ऐकू आले..."....काका आता
जाम टरकले...." अग
काही नाही...म्हणजे...हि ना...हि...हि...आपल्या पुरु
ची मुलगी जीवना....तुला आठवतो
का पुरु.... पुरुषोत्तम
रानडे.....मी तुला सांगायचो
त्याच्याबद्दल...आठवला का..."..
काकांनी काकूंच्या डोळ्यात
डोळे घालून बघितले....हिने काय
ऐकले असेल...ह्याचा
अंदाज घेत असावेत...
काकू विचारात बुडाल्या
होत्या...." हा हा..अच्छ्या!!! आठवला आठवला....तुमचा
तो घनिष्ठ मित्र
ना...जो आता
USA मध्ये असतो....खूप हुशार
होता ...वर्गात पहिला
दुसरा नंबर असायचा
आणि त्याचा पेपर
बघून तुम्ही पास
होयचा, आणि ज्याचे
कपडे तुम्ही चोरायचा
आणि वापरायचा… आणि
त्याच्या डब्यातला लाडू गुपचूप
खायचा..तोच ना तो??” काकूंनी
काकांकडे बोट दाखवत प्रश्न केला...आता काकू फुल्ल
फॉर्म मध्ये आल्या होत्या...”त्याने स्वतःचा
व्यवसाय सुरु केलेला
आणि तो खूप मोठा होत
होत त्याने नंतर
USA मध्ये जम बसवला
होता.." ...." हो हो
तोच....आठवला ना
तुला...बास झाला.."
स्वतःची आब वाचवत
काका म्हणाले......" अय्या
, अग जीवना... अग
अग आत ये....बाहेर का
बसली आहेस...बघा
हो, मी पण तिला अजून
आत बोलावले नाही...डोकं ना
माझा..." काकुनी सगळे
हावभाव करून तिला नंतर
हाताने धरून आत आणले... ती मुळ्ळीच
आत जायला तयार
नव्हती ... त्या मोहनने
परत चावले तर ????..तिची तर
दातखिळीचं बसली होती...काकू ओढत
होत्या आणि हि मागे मागे
सरकत होती... ते
दृश्य बघून कोणीतरी
म्हणाले असते कि,
आपल्या मुलीला ओढून
ताणून अभ्यासाला बसवत
आहेत कि काय हि लोक
!!!..." अगं चल तर...काय झालं..."
काकुनी शेवटी नं
राहवून विचारले...." काही
नाही काही नाही
काकू, ते कुकुकुकुत्रं
म्हणजे तो मोमोमोमोमोमो
मोहन....मला जाम भीती
वाटते हो त्याची..."
काका काकू दोघेही
खूप हसले.....”हम्म
!!!म्हणून
आम्ही ती पाटी लावली आहे...तो कोणाच्याही
अंगावर जायला इतका
उत्सुक असतो ना कि बासच
!!!”, काकू हातवारे
करत अगदी प्रेमाने
सांगत होत्या..." मग
असला danger कुत्रा पाळायचाच
कश्याला..." मी किंचाळत
बोलले...." अग तो
काही करत नाही...फक्त कोणी
अनोळखी दिसले कि
चावतो... बरंच आहे
ना...नाहीतर चोर
बीर येउन कधी
काय करतील सांगता
येत नाही...आमच्या
मोहन ची चर्चा
इतकी आहे ना कि गेले
५ वर्षांमध्ये आमच्याकडे
चोर काय पण आजूबाजूचे पण यायला
दचकतात...फोन करून
आधी त्याला बांधा
असा सांगतात आणि
मगच येतात.."....तिला
आता दरदरून घामच
फुटला....तिला आधीच
कुत्र्यांची भीती त्यात
काकुनी केलेल्या वर्णनाप्रमाणे
तर तो तिला आता मोगली
मधला वाघच वाटत
होता...जो समोरच्याची
शिकार करतो आणि
त्याला फाडून खातो....ती स्वप्नात
हरवली होती आणि
काकूंनी तिला कधीच
हात धरून आत आणले होते...
ती स्वप्नातून जागी झाली
तेव्हा तिच्या समोर
मोहन होता.....ती
किंचाळली आणि तिने
सोफ्यावर उडी मारली...
काकूंचा हात अजूनही
तिच्या हातात होता...मोहन सावकाश
आपली शेपटी हालवत
हालवत काकूंच्या जवळ
आला आणि अतिशय
लाडाने आपले अंग
घासू लागला....आता
तर तिची फुल
टरकली होती.... तिचे
हात- पाय थरथर
कापत होते....दातांचा
कडकड आवाज येत
होता... मोहनचे तोंड
तिच्या बाजूला होते...
हा शांत दिसणारा
वाघ कधी आपल्या
अंगावर येईल आणि
आपल्याला खाईल सांगता
येत नाही... “काकू
काकू मला वाचवा ( काका मला वाचवा चे female version )
म्हणत ती ओरडायला
लागली.... “अगं काही
नाही, होणार....तुला
आधीच सांगितलं ना
मी... सोफ्यावरून खाली
ये बरं अगोदर”
... तिला काकूंचे आधीचे वाक्य
आठवले... तो कोणाच्याही
अंगावर
जायला
इतका
उत्सुक
असतो
ना
कि
बासच
!!!, “हो हो होहोहोहोओ
“ती थरथरत बोलली
.. काकुनी तिला खेचलेच
....आता ती आणि मोहन समोरासमोर
होते.... तिचे हात
पाय लटपटायला लागले....
तिचे अंग लटपटत
होते...आणि चेहरा
पांढरा फट्टक पडला
होता.... आता झिंग
झिंग झिंगाट होऊन
अंगात येईल असा
तिला वाटायला लागले...
मोहनने तिला पहिले....आणि तो
तिच्या दिशेने चालायला
लागला....तिला गाणे
आठवले...." जो इस
दुनिया में आता हैं, उसे
एक बार जाना
हि होता हैं"
पण हि वेळ एवढ्या लवकर
येईल असे वाटले
नव्हते....अग बाबा
बयो...ती नखे कुरतडायला लागली...
“मोहन, बघ ताई…जीवना ताई....हेल्लो करा
तिला....आपली ताई
आहे ती”....काकू
मोहनला असा सांगत
होत्या जसं काय त्याला सगळं
कळतच आहे... कुत्र्यांना
कळतं असते तर ते माणसं
झाले नसते का....तिचे डोळे
आता चकणे झाले
होते....कधी हे कुत्रं चावतंय
आणि मी डॉक्टरांकडे
पळतिये आणि तिथूनच
injection घेऊन कलटी मारतीये
असे तिला झाले
होते....राम राम राम राम....तिचा जप
चालू होता....इकडे
मोहन ऐटीत तिच्या
दिशेने येत होता..जसे कि
तो ह्या घराचा
शेहेन्शहा आहे ...बादशाह
आहे.... तिने डोळे
मिटले...
आणि काय आश्चर्य
!!!! मोहन अगदी शहाण्या
बाळासारखा तिच्या जवळ
गेला आणि handshake साठी
त्याने हात पुढे
केला.....my god ....तिला तिच्या
डोळ्यांवर विश्वासच बसेना.....तिने
घाबरतच तिचा हातपुढे
केला....आणि त्याला
shakehand केले....मोहन ने
हुंकारार्थी सूर ओढला....जसे कि
त्याला जीवना आवडलीच
होती....
आता मला खूप
भारी वाटतेय....feeling relaxed chillaxed yoooo…तिने सुस्कारा
सोडला....आणि डॉक्टरांकडे
जाऊन कलटी मारायच्या
विचाराला पूर्णविराम दिला....
आता मोहन आणि
जीवना बेस्ट friend झाले
होते.... ती सोफ्यावर
जाऊन बसली आणि
मोहन लगेच तिच्या
पायापाशी जाऊन बसला...
"प्राण्यांना
माणसांची जाणं असते...ते बरोबर
माणस ओळखतात...." काकू
म्हणाल्या....तिला हि
ते पटले..." बसं
हा, तुला चहा
करून आणते...." काकू
म्हणाल्या आणि आत
मध्ये गेल्या...
ओम साई राम...ओम साई
राम....आतून जप करत एक
आजीबाई हळू हळू
hall मध्ये आल्या... काकांनी तिला
खुर्चीवर बसायला सांगितले.....त्यांनी मला पहिले
आणि कोण हि असा प्रश्नार्थक
लूक काकांना दिला....काकांनी माझी थोडक्यात
माहिती सांगितली...जीवना
US मध्ये असते आणि
आता सध्या भारत
दोर्यावर आली आहे
आणि आता काही
महिने ती आपल्याकडे
guest म्हणून राहणार आहे
...असे सांगितले....परदेशी
मुलगी आणि इथे,...असा काहीसा
भाव तिला आजींच्या
डोळ्यात वाटला....त्यांना
मनमोकळा करण्यासाठी ती
म्हणाली....आजी मी
भारतामध्ये नेहमी येते..
माझे आजोळ, म्हणजे
आई आणि बाबांचे
दोघांचे पण भारतामध्येच
आहे.....आई कोकणातली
आणि बाबा मुंबई
चे... शहरी आणि
ग्रामीण अश्या दोन्ही
संस्कृतीचे मी मिश्रण
आहे....आणि ती हसली.... तिचे अस्खलित
मराठी आणि भारतीय
संस्कृतीचा अभिमान पाहून
आजींना बरं वाटले...
दोघींचे सूर जुळत
आहेत असे पाहून
काकांनी , 'चला थोडा
वेळ विश्रांती', असे
म्हणून तिथून पळ
काढला....
तू परदेशात राहत असून
तुझे मराठी खूपच
छान आहे गं...आजीने प्रेमाने विचारले..." हो आजी....आम्ही तिकडे
सुद्धा मराठी मध्ये
बोलतो...तिथल्या काही
लोकांना मी मराठी
शिकवते...त्यांच्यासाठी ती foreign language म्हणजे परदेशी
भाषा आहे...अभ्यासाला...
त्यांना मराठी शिकल्याचा
आनंद आणि मला शिकवल्याचा..." ती गोड
हसली.. आजींना आता
ती आपल्यातलीच वाटू
लागली..." हो पण
आजी...माझ्या मराठी
वाचनात भर पडावी
आणि ते द्विगुणीत
व्हावे म्हणून मी
वरचे वर भारत दौरे करते....सगळे प्रदेश
फिरते...तिथल्या लोकांसोबत
राहते... त्यांचे राहणीमान...आचार
विचार...शिकते आणि
समजून घेते..." "म्हणजे
गं....तू नक्की
काय करतेस...आणि
कश्यासाठी ?" आजींचा प्रश्न
आला.... “आजी मी
टीचर आहे... foreign मध्ये
एक स्कूल मध्ये
मी part time जॉब
करते आणि एकीकडे
माझे शिक्षण पण
चालू आहे...मी
भारतीय संस्कृती आणि
आचार- विचार ह्यावर
मध्ये PHD करणार आहे”...
आजींना एक सुखद धक्का बसला....आणि त्या
गोड हसल्या... आणि
तेवढ्यात आतमधून मस्त
फोडणीचा वास आला....
चहा सोबत आज गरमागरम पोहे पण मिळणार, ह्या विचाराने
तिला जाम भूक लागली.... सकाळी यायचा
आपला विचार किती
रास्त आहे असे तिला मनोमनी
वाटून गेले...
आजींना तिच्या मनातले
विचार कळले असावे...त्यांनी हाक मारली..."अगं माधवी,
झाला का नाही चहा..पोरीला
भूक लागलीये....सकाळपासून
काही खाल्ले नाहीये
तिने...आण आण लवकर.."..." हो हो
आई झालाच आहे...आले ." असं म्हणत
एक ५ एक मिनिटामध्ये तिच्या समोर गरमागरम
पोहे आणि आल्याचा
वाफाळलेला चहा आला....
उम्म वाह वाह...काकू...असं
जर मला रोज खायला मिळाले
तर मी भारत सोडून कुठे
जाणारच नाही...तिने
दाद दिली आणि
पोहे चट्टामट्टा केले....काकू आणि
आजी तिच्याकडे कौतुकाने
पाहत होत्या....
चहा आणि पोहे
ह्यावर मनसोक्त ताव मारून
झाल्यावर जीवना एकदम
खुश झाली... त्यानंतर
तिच्या आणि आजीच्या
गप्पा सुरु झाल्या....तेव्हा दुपारचे
२ कधी वाजले
कळलेच नाही..."आई
चला जेवायला, पान
वाढले आहे..." माधवी
काकू तिकडून आल्या....तेव्हा त्यांना
आपण किती गप्पा
मारल्या, ह्याचे भान
आले...जीवना ने
आजींना उठवले आणि
त्यांना आधार देत
टेबल पाशी आली...त्यांना खुर्चीत बसवले...काकू आणि
जीवना दोघी पान
वाढत होत्या... सर्वांची
जेवण झाल्यावर काकू
आणि ती बसली....आणि गप्पांमध्ये
त्यांना जेवायला १
तास लागला.... काका
हे सगळा मगाचपासून
निरीक्षण करत होते....हि एवढीशी
मुलगी आली काय...बोलायला लागली काय
आणि आपलीशी झाली
काय... मनाशी ते
हसले आणि शतपावली
घालायला निघाले...
संध्याकाळचे ७ वाजले
आणि घरात एकदम
जोरात आवाज आला...."आई आई,
मला आधी जेवायला
दे...मला भूक लागलीये...."...आणि त्याने
डबा फेकून दिला
आणि स्वतःचे शरीर
सोफ्यावर लोटले....”अरे अरे किती वेळा
तुला सांगितले कि
शाळेतून आल्यावर आधी
हात पाय तोंड
धुवावे...डबा kitchen मध्ये आणून
ठेवावा...दप्तर जागेवर
ठेवावे...शिस्त म्हणून
नाही ह्याला काही”....
"तू मला देणार
आहेस का खायला
का मी बाहेर
वडा पाव खायला
जाऊ..".. तो म्हणाला....
काकूंनी कपाळाला हात लावला
आणि ती स्वयंपाघरात
गेली...५ च मिनिटांमध्ये काकुनी त्याला
दुध आणि थालीपीठ
आणून दिले....त्याने
ते खाल्ले आणि
आपल्याच नादात रूम
मध्ये निघून गेला...
“हे असं आहे बघ...सौरभ,
आमचा मुलगा...तू
समोर आहेस हे पाहून सुद्धा
न पाहिल्यासारखे करून
निघून गेला बघ...
तूच समजाव त्याला”....काकू निराशवाणा
सूर ओढत निघून
गेल्या..
हुम्म...सौरभ सोबत
तर खूपच मजा
येणारेय आता....जीवनाचे
डोळे आनंदाने चमकू
लागले....तिच्या डोक्यात
काहीतरी चालले होते
हे नक्कीच...
आज मैं नीचे
आसमा उपर...आज
मैं भागू जमाना
हो पीछे....ती
गात गात सौरभच्या
रूम मध्ये आली....”पुच ...अग
काय गाणं गात
आहेस ताई...सगळं
चुकीचं...”सौरभ तिच्याकडे
बघत म्हणाला... "मग
तू सांग ना lyrics ..." मला
नाही वेळ असल्या
गोष्टींसाठी, असं म्हणत
तो football खेळायला बाहेर पडला....
ती त्याच्या मागे बाहेर
पडली...बाहेर तो
एकटाच खेळत होता.....तिने त्याच्या
हातातला बॉल उडवला
आणि खेळायला लागली....तो मागे
हि पुढे... मधेच
तो बॉल हिच्या
हातात एकदा त्याच्या
हातात...आणि त्यांचा
खेळ चालू झाला....
खेळता खेळता २ तास कसे
निघून गेले त्यांना
कळलेच नाही....ए
ताई, तू भन्नाट
खेळतेस राव.... मजा
आली ...आता मी जाम दमलो.....हाश हुष
करत सौरभने घरात
एन्ट्री केली... आणि
दोघांनी एकमेकांना टाळ्या
दिल्या...
बर, तुझी ह्या
छोट्या डॉन सोबत
पण ओळख झाली
तर....माधवी काकू
हसत हसत बाहेर
आल्या...चला आता हात पाय
तोंड धुवा आणि
जेवायला चला.... रात्रीचा
मस्त आमरस पुरीचा
आणि मसाले भाताचा
बेत झाला.... जेवताना
खूप दिवसांनी सन्मान
मध्ये एवढा हसण्याचा
आणि गप्पा मारल्याचा
आवाज येत होता...
घर पूर्णत्वाला येत
होते...
दुसऱ्या दिवशी काकांचा
आणि जीवनाचा भटकंतीचा
प्लान होता....पुणे
दर्शन... त्यासाठी दोघेपण पहाटे
५ वाजता उठले
होते... ट्रेकिंग pant, shoe, टोपी
, sack...त्यामध्ये पाण्याची बाटली....ग्लुकोज चे पाणी...biscuit
...रुमाल असे लागणारे
साहित्य ...mobile आणि purse असे सगळे
समान सुमान कालच
pack करून झाले होते....
" स्वारी निघाली वाटते....थांबा मी
चहा करते”...माधवी
काकू म्हणाल्या....नको
नको.....आता वेळ नाही आम्हाला....cu
in evening ...असे म्हणत जीवना
काकांचा हात ओढत त्यांना बाहेर घेऊन
पण गेली....अर्धवट
ताठरलेले डोळे घेऊन
काकू परत झोपायला
गेल्या....
आज घरात शांतता
होती....आजी जप करण्यात गुंतल्या होत्या....सौरभ शाळेत
गेला होता... घरचा
माळी बागकाम करत
होता...माधवी काकूंना
आज खूपच शांत
शांत वाटत होते...
काल आलेली
पोरगी पण घर किती आपलेसे
केले तिने....त्यांनी
विचार केला....आणि
त्या फोनकडे वळल्या...."अरे अर्णव...आई बोलतीये...बोलू शकते
ना रे....किती
वाजले आहेत तिथे
आता..बर बर...रात्रीचे ९ का...मग ठीक
आहे.....जेवलास का
रे..." काकुनी असं
बोलत चांगल्या अर्धा
तास गप्पा मारला....आपण international call केला आहे
हे विसरून.." अग
आई...बर बर ठीकेय...तुला फोन
करतो परत...आता
जरा एक assignment तुझ्या
भाषेत गृहपाठ करून
देयचा आहे....तो
मी करतो आणि
तुला उद्या सकाळी
म्हणजे Indian time मध्ये रात्री
८ च्या दरम्यान
फोन करतो....." अर्णव
ने बोलून फोन
ठेवला.... वय वर्ष
२३ पण इतका समंजस.....engineering करून लंडन
ला जाऊन MS करायचा
निर्णय पण त्याने
खूप लहान वयात
घेतला होता....त्यासाठी
लागणारी पैश्यांची जुळवाजुळव.....entrance
exam चा अभ्यास....वेळोवेळी
teachers चे घेतलेले सल्ले...engineering नंतर
२ महिन्यात त्याला
हव्या त्या college मध्ये
मिळालेली admission ...घरात दंगा...बाबांना झालेला आनंद...आजीने केलेले
लाडू....सौरभ आणि
अर्णव ने नाचून
नाचून केलेला धिंगाणा....
काकूंना १ मिनिट सगळं flashback आठवला.... त्याला लंडन
ला जाऊन आता
१ १/२ वर्ष झाले
होते....MS चे अजून
६ महिने, मग
तिथेच नोकरी नाहीतर
पुणे मध्ये येउन
व्यवसाय करायचा...असं
ठरले होते...
oh my god .....काकू आज
जाम मजा आली....
काका आणि जीवना
सोफ्यावर टेकत म्हणाले...
“अग बाई, आलात
वाटतं...” काकुनी
विचारले... काकू आता
मस्त तुमच्या हातचं
जेवेनच....असा म्हणत
जीवना फ्रेश होयला
गेली....
जेवणाच्या
table वर नेहमीप्रमाणे गोंधळ चालू
झाला....आज काय काय पहिले...
दगडूशेठ गणपती चे
पहाटे पहाटे दर्शन
घेऊन....सारसबाग, पर्वती...केळकर संग्रहालय,
तुळशीबाग, लक्ष्मी रोड..असा
करत दुपारी सिंहगड
किल्ला ...वाह भन्नाट....काका जाम
सॉलिड आहेत काकू...काय पटापट
चढल्या त्यांनी पार्वतीच्या
पायऱ्या....मी तर
१०० वेळा थांबले
असेल... जीवना म्हणाली
आणि सगळे जण हसण्यात बुडाले....
जेवणानंतर काका आणि
काकू शतपावली साठी
बाहेर पडले...जीवना
आणि सौरभ video game खेळण्यात
एवढे दंग झालेले
कि आवाज करू
नका असं काकांनी
४-५ वेळा सांगून पण
त्यांना ऐकू आले नाही....
“मुलगी great
आहे बरका... आज
तिने काय सॉलिड
प्लॅन केला होता...मी जाम
खुश आहे आज..
खूप वर्षांनी एवढा
फिरलो असेन एवढा..
“काका म्हणाले...”अहो
तुम्ही पण का ??” काकुनी
चमकून काकांकडे पहिले....काय झालं
? काकांनी प्रश्नार्थक रीतीने काकूंकडे
पहिले....अहो, तुम्ही
पण जीवना सारखी
भाषा बोलायला लागलात
कि....सोल्लिड ..भन्नाट....एकाच नंबर....great
...अरे हो कि रे...काकांनी
डोक्याला हात लावला.....आणि नेहमीचा
शांतपणे पार पडणारा
walk आज रमत गमत हसत गप्पा
मारत त्यांनी एन्जोय
केला...
दोघे घरी आले
तेव्हा सौरभ झोपला
होता....आजींच्या खोलीचा
दिवा मात्र अजून
चालू होता... अरे,
हि दिवा बंद
करायची विसरली वाटते....काका लगबगीने
आजीच्या खोलीत जायला
निघाले....तिथे त्यांना
जीवना आणि आजी जवळ जवळ
बसून अल्बम बघताना
दिसल्या... ती आजीनं
अगदी उत्सुकतेने हे
कोण ते कोण विचारात होती....आणि
आजी फुल हिस्टरी
रंगवून रंगवून तिला
सांगत होत्या... काकांना
आठवले....आई म्हणायची
कि एकदा माळ्यावरचा
अल्बम काढ रे.....मला पहायचे
आहेत फोटो....माधवी आणि
माझ्या लग्नापासून ते
अर्णव - सौरभ च्या
लहानपणाचे.....शाळेतले त्यांचे दिवस....
घरातले सण-समारंभ
, अर्णवचे पदवी चे
दिवस, त्यांचा college group , असे
बरेच अल्बम कित्तेक
वर्ष माळ्यावर धूळ
खात पडले होते...
आपण खरंच आपल्या
आयुष्यात एवढे बिझी
झालो आहोत का कि आपल्याला
ते काढायला आणि
आठवणी जाग्या करायला
वेळ नाही..? काकांना
प्रश्न पडला.... पण
आज जीवना ने
तो माळ्यावरचा अल्बम
काढून आजीच्या आठवणींना
उजाळा दिला होता...
तेवढ्यात " हा आमचा
अर्णव बरका...आता
लंडन मध्ये असतो...MS
करायला गेलाय...." आजींचा
आवाज त्यांच्या कानी
पडला.....त्यांनी एकदा जीवना
कडे पहिले.....ती
त्या फोटोकडे बघत
होती आणि आजीची
बडबड अगदी एकाग्रतेने
ऐकत होती... काकूंचा
हात काकांच्या खांद्यावर
पडला....त्यांनी मागे
पहिले.... तिचे डोळे
पण तेच बोलत
असावे, जे त्यांच्या
मनात चालू होते...
“अहो ऐकलात का?
अर्णवचा फोन आला आहे”.....”आलो आलो”.....काका पळत
पळतच फोनपाशी आले.....”बोल..बोल
रे...कसा आहेस....मी मजेत....अच्छ्या, दिवाळीला येतोस म्हणतोस..छान छान
अरे, किती वाट
पहायची तुझी....बर,
ओके ओके...” काका बोलत
होते....त्यांचे सुखसंवाद
आजी आनंदाने ऐकत
होत्या...आणि मनातल्या
मनात आता काय काय करायचे
आहे, ह्याची तयारी
पण करायला लागल्या
होत्या...
आज जीवनाचा काही वेगळाच
मूड होता....फोन
संपवून काका Table पाशी
आले....”अगं ऐकलंस
का? आपला अर्णव
येतोय....१५ तारखेला....चांगला महिनाभर
आहे बरका ह्या
वेळेस... हेहे..चल
आता तयारीला लागा....
“काकूंच्या अंगात एकदम
जोश संचारला आणि
त्या वेगाने कामाला
लागल्या .. जीवनाचे मात्र कोणाकडे
काही लक्ष नव्हते...ती तिचे
काम करण्यात मग्न
होती... कात्रीने कापून
काही तुकडे ती
चिटकवत होती.... तिच्या
शेजारी मोहन शांतपणे
बसला होता... “मग
जीवना आज काय प्लान ?” काकांच्या प्रश्नाने
ती भानावर आली...
आं, असा काहीसा
विचार करत तिने
काकांकडे पहिले... “अगं मी काय म्हणत
आहे....आज काय प्लान?”.. “उम्म काका....मी तुम्हाला
ह्याचे उत्तर देईन
पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक
काम करावे लागेल”...
सगळ्यांनी एकमेकांकडे पहिले....”काय
काम ग?...मला
जमेल का”...आजी
ने विचारले... “हो
हो आजी...का
नाही??”....”हा तर
मग सांग”....पुढचा
पूर्ण दिवस जीवना
समोर आणि बाकीचे
तिच्या शेजारी गोल
बसून कात्रण काम
करत होते....हॉल
मध्ये रंगीबेरंगी कागदांचा
पसारा पडला होता....
कात्री...डिंक...कागद...
पुठ्ठा असा मांडले
होते....सौरभ सगळ्यात
जलद गतीने काम
करत होता....पहिला
number...बाकीचे सगळे
जण कामात इतके
मग्न झाले होते
कि दुपारचे २
कधी वाजले कळलेच
नाही...”अगो बाई,
जेवायचा का नाही कोणाला??”...काकुनी हातात
कागद आणि कात्री
धरत विचारले...काकांनी
चष्म्यातून तिच्याकडे पहिले....”तू
वाढलेस तर नक्की
जेवू”.....काका हसत
म्हणाले...”बाई बाई
ग”...म्हणत काकू
हातातला कागद टाकून
पळतच स्वयंपाघरात गेल्या...
अर्धा तासात आमच्या
समोर गरमागरम झुणका
भाकरी आली...आजी
ची favourite dish ...सगळ्यांनी त्यावर ताव
मारला....awesome काकू....तुमच्या हाताला
इतकी चव आहे कि मी
तुम्हाला घेऊन आता
US लाच घेऊन जाणार
आहे कायमचं...म्हणजे
मला रोज असा खायला मिळेल....”
हो ग बाई ,आता तुझ्याकडेच
मी राहणार कायमची”....काकूंनी
काकांकडे बघत डोळा
मारला....आणि तिच्याकडे
पहिले....ती आपली
झुणका भाकरी खाण्यात
मग्न होती... पिठल्यात
बोटं घालून चाटत
होती….तिचा निरागसपणा पाहून काकुंना एक उत्साह
वाटत होता... मनातल्या मनात त्या खुश होत्या..
जीवना काही सांगत
नव्हती, पण पूर्ण
घर तिने सांगितलेल्या
कामात बुडून गेले
होते... सौरभची नुकतीच
परीक्षा झाल्यामुळे तो
सुद्धा घरी राहून
सगळ्यांना मदत करत
होता... दिवाळी च्या
सुट्टीचे बेत आखत
होता... बुधवार...गुरवारचा
दिवस संपला.... आज
शुक्रवार... २ दिवसात
जवळपास १०० एक आकाशकंदील तयार झाले
होते... एवढ्या सगळ्या
आकाशकान्दिलांचे नक्की काय
करायचे हा प्रश्न
सगळ्यांना पडला... १ महिन्यानी
बरोब्बर सोमवार पासून
दिवाळी चालू होणार
होती.... त्यासाठी ही तयारी
चालली होती हे नक्की होते...
“चला चला सगळ्यांनी
आज लवकर आवरून
बाहेर पडायचे आहे...
काका आज तुमची
४ व्हीलर मी
चालवणार आहे...कारण
मला आजींना सुद्धा
सोबत नेयचे आहे”
असे म्हणत जीवना
ने गाडी च्या
किल्ल्या घेतल्या सुद्धा... मोठमोठ्या
पिश्याव्यांमध्ये ते आकाशकंदील
काकू आणि सौरभ
ने अलगद ठेवले
होते....जीवना ने
त्या पिशव्या कार
मध्ये ठेवल्या....आणि
सगळे जण नीट बसतील अशी
सोय करून तिने
सगळ्यांना जेवणानंतर जाऊ असा सांगितले....
दुपारी जेवणानंतर सगळे जण निघाले...आज खूप दिवसांनी बाहेर पडणार
ह्या विचाराने आजी
एकदम खुश होत्या....नवीन कोरी
साडी नेसून त्या
कधीच बाहेर येऊन
झोपाळ्यावर बसल्या होत्या...
सौरभने jeans आणि t -shirt घातला होता...सोबत त्याचा
favourate फूटबॉल होताच.. काका काकू
पण तयार होते...काकूंनी आज चक्क गजरा माळला
होता... काकांनी बहुतेक
कौतुकाने आणला असावा...दोघे खुश
दिसत होते... तेवढ्यात
जीवना बाहेर आली...डार्क गुलाबी
रंगाचा पंजाबी तिने
घातला होता....त्यावर
गोल्डेन रंगाची सलवार
आणि ओढणी शोभून
दिसत होती... केसांची
वेणी आणि गळ्यात
एक bag ज्यामध्ये डायरी
, पेन, पैसे असे
साहित्य असावे... “कशी
दिसते आजी मी” एकदम stylish pose देत तिने विचारले.......”.एकदम झक्कास”....
जीवना style उत्तर आजीने
दिले आणि तिच्या चेहऱ्यावरून
हात फिरवला.... सौरभ
तर आं वासून
बघत होता.... काका
काकुंना पण तिचे हे रूप
नवीनच होते,,,, नेहमी
T - shirt , ३/४ jeans मध्ये दिसणारी
मुलगी आज खूप वेगळीच दिसत
होती... तिचे हे रूप सर्वाना
सुखावणारे होते....
थोड्याच वेळात गाडी
एका गेट पाशी
येऊन थांबली....."प्रदर्शन
आणि विक्री" असा
फलक तिथे लावला
होता...तिने गाडी
पार्क केली....आणि
सगळे जण आत जायला निघाले....
आतमध्ये मोठे उद्यान
होते..आणि तिथे बरेच
stall होते ...तिथल्या एका stall वर
सगळे जमलो, त्याचे
नाव होते सन्मान....
आजूबाजूला नजर टाकली
तर त्यांच्यासारखीच बरीच
कुटुंब तिथे आली
होती... काहींनी stall लावले
होते...काही लावत
होते... छोटी मुला
समोर खेळत होती...
आयोजक मंडळी सगळ्यांना
मदत करत होती...
जीवनाने आपला stall खूप
सुंदर रीतीने सजवला
होता... रंगीबेरंगी आकाशकंदील
लक्ष वेधून घेत
होते... थोड्याच वेळात
तिथे गर्दी जमायला
लागली... फराळ, आकाशकंदील,
पणत्या, वेगवेगळे दिवे,
रांगोळ्या-रंग, गालिचे,
कपडे असे नाना
प्रकारचे जवळपास 50
एक stall तिथे उभे
राहिले होते... थोड्याच
वेळात तिथे १०-१२
बस आल्या....त्यामधून छोटी
छोटी मुलं आणि
काही वृद्ध मंडळी
उतरली... संयोजकांनी त्यांना प्रत्येक
stall जवळ जाऊन बसायला
जागा दिली... छोटी
मुलं त्यांना आवडणाऱ्या
stall वर जाऊन पोहचली
होती... वृद्ध मंडळी
कार्यकर्त्यांचा हाथ धरून
stall जवळ जात होती....काही आजोबा
लोक एकदम उत्साहाने
कामाला लागली होती....काही आजी
वस्तू पाहण्यात मग्न
झाल्या... सन्मान जवळ
२ आजी आणि ४-५
मुलं जमली.... ती
मी ती मी असा म्हणत
पोरांनी आकाशकंदील हातात
घेतले... तोपरयेन्त जीवनाने प्रत्येक
आकाशकंदील वर price tag चिटकावले होते...
काका काकुंना काय चाललेय
ते समजत नव्हते...ते इकडे
तिकडे पाहत होते...आजूबाजूंच्या stall वरच्या काका
काकू येऊन बोलून
जात होते....१०-१२ कुटुंबांचा
एक group च तयार
झाला होता... सौरभ
ला ती छोटी छोटी पोर
सतावत होती... दादा
दादा म्हणत त्रास
देत होती.... कधी
नव्हं ते मोठेपणाचा
मान मिळाल्याने तो
सुद्धा दादागिरी बजावत
होता.... तेवढाच छोट्या
मुलांवर लक्ष्य देऊन
काळजी घेत होता...
मोहन सगळ्या छोट्या
मुलांभोवती गोल गोल
फिरत होता...भो
भो आवाज काढत
त्यांचे मनोरंजन करत
होता...आता त्या
२ आजी आणि हि आजी
असा हास्य क्लब
झाला होता आणि
त्या आपल्याच नादात
हसत होत्या... काकूंनी
सन्मान stall समोर
सुरेख रांगोळी काढली...
छोट्यांनी त्यामध्ये रंग भरायला
सुरवात केली...असा
करता करता संध्याकाळचे
५ कधी वाजले
कळले नाही... आता
लोकांची रांग सुरु
झाली... पहिले १०
मग ५० अश्या
संखेने येणारी लोक
आता १००-१५० च्या पटीने
यायला लागली... पोर
आकाशकंदील घ्या ...आकाशकंदील घ्या
म्हणून ओरडायला लागली
आणि आमच्या stall वर
गर्दीचा लोट उसळला....
आकाशकंदील कमी पडतील
हा अंदाज बांधूनच
जीवनाने extra चे साहित्य
आणून ठेवले होते....
काही पोर...सौरभ
आणि ती मागे बसून अजून
आकाशकंदील करत होती.....काका सगळ्यांना
आकाशकंदील दाखवत होते...हवा तो
रंग काढून देत
होते... काकू हिशोब
करत होत्या....काय
कमी पडत आहे ते सांगत
होत्या... म्हणता म्हणता
रात्रीचे ९ वाजले....सूर्यकिरणांची जागा आता
इलेक्ट्रिक दिव्यांनी घेतली होती...
जेवढा लोट बाहेर
जात होता तेवढाच
आत येत होता...शेवटी entrance चे दार
बंद करून..." तुम्ही
दिलेल्या उत्युंग प्रतिसादाबद्दल धन्यवाद....विक्रीचा सगळा माल
संपला...आम्ही आभारी
आहोत ..." असा बोर्ड
कार्यकर्त्यांनी लावला आणि
सगळ्यांनी मोकळा श्वास
घेतला....
सन्मान च्या जवळपास
२५० कंदील विकले
गेले होते.... ५०-७०-१००
रुपयांचे आकाशकंदील सगळ्यांनी आनंदाने
विकत घेतले होते....
काकूंनी शेवटचा एकदा
हिशोब चेक केला
आणि रेघ मारली...
जवळपास १5००० रुपये
जमले होते.....सगळ्यांना
आनंद झाला होता...सौरभ तर
आनंदाने उड्या मारायला
लागला....जीवना ने
ते पैसे एका
मलमली पाकिटामध्ये टाकले
आणि आजीच्या हातात
दिले...आजी हे तू ह्यांना
दे... समोर ती ५ पोर
आणि आजी होत्या...
आजीने त्यांना ते
पाकीट सुपूर्त केले...
त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यात एकाच
भाव होते... आनंदाचे....प्रेमाचे आणि एका नवीन ऋणानुबंधाचे...
सर्वांचा निरोप घेऊन
घरी यायला जवळपास
१ वाजला.... येताना
कार मध्ये कोणी
बोलत नव्हते...एक
शांतता होती....पण
ती शांतता प्रसन्नपणे
सर्वांच्या मनात भरून
राहिली होती.. घरी
येऊन सर्वजण शांतपणे
झोपले... ते उद्या
नवीन सुरवात करण्यासाठीच...
कधी पुणे दर्शन...कधी मुंबई...कधी एखादा
नाटक किवा classical संगीताचा
कार्यक्रम... कधी त्याच
आजी-आजोबा आणि
छोट्यांना आश्रमात जाऊन भेटायचा
कार्यक्रम... कधी किल्ले
कधी ट्रेकिंग असं
करता करता १ महिना कधी
गेला कळला नाही...Maharashtra
दर्शनाचा घाट काका
आणि जीवनाने घातला
होता.... जिथे जात
तिथली माहिती ती
जमा करायची आणि
लिहून ठेवायची....रात्री
FB वर तिचे, सौरभ
चे आणि काकांचे
फोटो पाहायला मिळायचे
आणि आज काय काय मजा
केली ते समजायचे...
कधी मुक्काम तर
कधी १ दिवसाचा
प्रोग्राम आखलेला असायचा...आणि त्याला
सगळ्यांची साथ असायची...
प्रवासाला नाही म्हणणारे
काका काकू तिने
आखलेल्या प्रवासात मात्र उत्साहात
तयारीने लागायचे... एक
वेगळा चैतन्य, एक
वेगळाच उत्साह आज
त्या घरात वावरत
होता... जीवना नावाने...आज त्यांना
जीवन मिळाले होते...
टिंग टोंग...टिंग
टोंग....टिंग टोंग
टिंग टोंग टिंग
टोंग...." अरे काय
यार, कोणाला सकाळी
सकाळी एवढी घाई
झालीये.." जीवनाने कानातल्या कॉर्ड्स
काढल्या आणि ती दरवाजा उघडायला
गेली...तिने दार
उघडले.....समोर एक
व्हाईट रंगाचा T - Shirt , goggle घातलेला,
हातात bag , खांद्याला
अडकवलेली सॅक, साधारण
5 फूट 9 इंच उंच असलेला, 22-23 वयाचा मुलगा
उभा होता.... आआईईईई
अशी हाक मारून
तो आता गळ्यात
पडणार इतक्यात त्याच्या
लक्ष्यात आले की
समोर भलतेच कोणीतरी
आहे... " काय आहे...आम्हाला काही नकोय...पुढच्या घरी जा..."
जीवना वैतागून बोलली...."
आजकाल ह्या सेल्समन
ना पण वेळ काळ काही
राहिले नाहीये..." असे
म्हणून ती दार लावणार तेवढ्यात
मोहन भो भो करत पळतच
आला....जीवनाला तिचे
सुरवातीचे दिवस आठवले...आपली जशी
त्रेधा तिरपीट झाली
तशी आज ह्या सेल्समनची होणार...तिला
असुरी आनंद झाला...अब आयेगा
मजा ... तिने टाळी
वाजवली …" मोहन अरे,
छू छू ....चाव
त्याला....अनोळखी व्यक्तींना
चावतोस ना तू...चाव ना
ह्याला..." तिचे डोळे
चमकले...आणि ती मजा बघायला
आतुर झाली... आणि
हे काय..." अरे
अरे माझा पपी...."
असं म्हणत त्याने
मोहनला जवळ घेतले
आणि तो त्याला
कुरवाळु लागला... मोहन
सुद्धा अतिशय लाडाने
त्याच्या जवळ जात
होता...त्याला चाटत
होता..." ओये व्हॅट
इस धिस ??? तु काय
माणुस बघुन चावायचं का नाही ठरवतोस का
?" जीवना आता डोळे
विस्फारून बघत होती....
“अगं अगं बघतेस
का....आपला अर्णव
आलाय बघ बाहेर....लगेच ये....”काका आणि
काकू लगबगीने बाहेर
आल्या....आजी पण
तिथे आल्या... काकुंच्या
हातात औक्षणाचे ताट
होते..... काकुंनी औक्षण केले
आणि त्याच्या तोंडात
पेढा भरवला... सर्वजण
आत आले.....
हा तोच का अर्णव...आपल्याला
आज्जीने सांगितलेले...म्हणजे हा काका-काकुंच्या मुलगा...अरे देवा, मी काय बोलून बसले...जीवनाचे
डोळे विस्फारलेले तसेच
राहिले.....आपण काय
बोलून गेलो हे तिला सुधरायला
10-15 मिनिटे गेली......सगळे आत जाताना अर्णव
आईच्या कानात हळूच
म्हणाला, "हे कोण
कार्टून घरी आलेय?
"... काकूंनी जीवना कडे
पाहिले....3/4 jeans ....अंगात जॅकेट
आणि कानात कॉर्ड्स...
हूड बांधून ...हात
जॅकेट मध्ये घालून
ती उभी होती....तिचे विस्फारलेले
डोळे आणि हूड मधून बाहेर
आलेले केस बघून
अर्णव तिला कार्टून
का म्हणाला हे
काकुंना लक्ष्यात आले
आणि त्या हसायला
लागल्या..." अरे आत
ये, सांगते सगळं..."...
सगळे हॉल मध्ये
आले.... काकु पाणी
आणायला आत गेल्या.....सगळे अर्णव
च्या आजूबाजूला जमा
झाले होते....मोहन
तर त्याच्याभोवती घिरटयाच
घालत होता....आजी
लाडाने नातवाच्या तोंडावरून
हात फिरवत होत्या...
त्याचे किती कौतुक
करू किती नको
असे त्यांना झाले
होते....अर्णव सुद्धा
खूप बडबड करत
होता....खरंच आहे
1 1/2 वर्षांमध्ये केवढे बोलायचे
राहिले असेल...जीवना
विचार करत खाली
करत बसणार..तेवढ्यात
काकूंचा आवाज आला..."अगं
अगं पडशील....खुर्ची बघून
तर बस... "...काकूंनी
खुर्ची जवळ ओढली
आणि जीवना थोडक्यात
वाचली...सगळ्यांचे लक्ष्य
तिकडे गेले आणि
एक शांतता पसरली....
काकुंनी अर्णव च्या
हातात पाण्याचा ग्लास
ठेवला....आणि शांतता
भंग करत म्हणाल्या...
"अरे अर्णव, ही
जीवना.... पुरुषोत्तम काकांची मुलगी....आपल्याकडे guest म्हणून आली
आहे... ती US मध्ये
असते, अधून मधून
भारत भेटीला येते...ह्यावेळेस खास आपल्याकडे
आली आहे..."….. " हो
हो आणि अरे आम्ही सध्या
खूप भटकंती करत
आहोत बरंका...पुणे
दर्शन...महाराष्ट्र दर्शन...social
activities ..Trekking आणि असा बरंच
काही..." काका हसत
म्हणाले.." ओहहो , बाबांच्या
facebook वर सध्या जे
फोटो आहेत ते हिचे आहेत
तर..." अर्णव मनात
म्हणाला... " surpise ना....?
" आजी म्हणाली...." आजीचे हे
नवीन रूप अर्णव
पहिल्यांदाच पाहत होतो...आजी आणि
चक्क इंग्लिश शब्द
वापरायला लागलीये..." हो हो...चांगलाच surprise आहे...मला
घरात पाऊल पडायच्या
आधीच प्रसाद मिळालाय
त्याचा..." अर्णव बोलला....जीवनाला आता रडूच
यायचे बाकी होते....
तिचा तो चेहरा
पाहून सगळे जोरजोरात
हसायला लागले...आणि
जीवना रडत रडत हसायला...!!!
तो दिवस हसण्यात....गप्पा मारण्यात....घरचे पदार्थ
खाण्यात (specially आजीने बनवलेले
डिंकाचे लाडू...आई
ने बनवलेला शिरा....मोदक...) असे खाण्यात
गेला... सौरभ अजून
शाळेतून आला नव्हता...तो आल्यावर
तर जो गोंधळ
होणार होता तो विचारायलाच नको...
"ए जीवना ताई....जीवना ताई....आज आपण
खूप प्रॅक्टिस करू
फुटबॉलची....आमची next वीक मध्ये
competition आहे...."सौरभ ओरडतच
घरी आला....त्याने
बॅग टाकली आणि
तो जीवनाच्या खोलीकडे
धावत गेला....आणि
तिला सगळं सांगू
लागला....तेवढ्यात त्याच्या मागून
‘भो’ असा आवाज
आला आणि तो दचकला...." अर्णव दादा......"
असं जोरात ओरडून
त्याने अर्णवला मिठी
मारली आणि घरात
गोंधळ सुरू झाला......गिफ्ट्स....बडबड..गप्पा....हसणे...खाणे....ह्यामध्ये तो दिवस कसा गेला
कळले नाही....आपण
सोडून पण ह्या घरामध्ये एक अजून डॉन आहे,
हे एव्हाना जीवनाला
कळून चुकले आणि
आज कधी नव्हे
ते ती शांत बसली होती....
" अरेरे, हिला मी
काही आणले नाही
बुवा.....मला काय
माहिती ही आपल्या
घरी आहे..." अर्णव
मस्करी च्या स्वरात
म्हणाला... " इट्स ओके...थँक यू..."
ती अजीजीने म्हणाली....आणि सगळे
परत हसायला लागले...
" तसेही ह्या डॉन
ला काय आणूं हे
मला कळलेच नसते
आणि मी ते आणलेच नसते.."...अर्णव पुटपुटला....आणि बॅग
आवरू लागला....
नुकतेच जेवण झाले
आणि सगळे बाहेर
अंगणात येऊन बसले....काका काकु
शतपावली घालत होते
आणि अर्णव आजीपाशी
खाली मांडी घालून
बसला होता...आजी
कौतुकाने त्याच्या केसावरुन हात
फिरवत होती...."दिवस
कसा संपला कळलं
नाही बघ आज अर्णव...तु आलास आणि घराला
घरपण आले..."..आजी
भावनिक होऊन
म्हणाल्या...." अग आजी
आता मी चांगला
महिनाभर आहे....दिवाळी
तुमच्यासोबतच साजरी करणार...."
अर्णव तिच्या जवळ
जात म्हणाला....आजी-नातवाचे प्रेम पाहून
काका काकूंना भरून
आले....आणि गप्पा
12 -1 वाजेपर्येंत झाल्या आणि
सगळे झोपायला गेले....
सकाळचे 6 वाजत होते....अर्णवला जाग आली आणि तो
बाहेर अंगणात आला....अजून कोणी
उठलेले दिसत नाहीये....चला कॉफी
करून प्यावी....तो
स्वयंपाघरात आला आणि
त्याने कॉफी करायला
घेतली....तेवढ्यात समोर त्याला
जीवना दिसली....अंगणात
चटई घालून प्राणायामाचे
काही प्रकार ती
करत होती.... मला
सेल्समन समजते काय
, चला आज जरा हिची खेचुया....
अर्णवने दोन कॉफीचे
मग हातात घेतले
आणि तो बाहेर
आला.....तिच्या शेजारी
तो जाऊन बसला....कॉफीच्या मस्त वासाने
तिची समाधी भंग
पावली....तिने एक
डोळा उघडला तसं
अर्णवने कॉफीचा एक
घोट घेतला..."वाह
काय वातावरण आहे...मस्त....पाऊस नुकताच
पडून गेला आणि
त्यात ही मस्त कॉफी...." तिला कॉफी
घेयचा मोह आवरेना....शेजारीच अजून एक coffee
mug तिला दिसला....ती तो
घेणार तेवढ्यात त्याने
काढून घेतला...." हा
असा exercise करते
का तु....नुसता
सोंग ...." तो तिला
दरडावून म्हणाला... ती
घाबरली आणि उठून
चालायला लागली...." अरे
अरे थांब...कुठे
चालली....एक तर
व्यायाम पण अर्धवट
सोडला आणि कॉफी
पण.."..." मला नकोय
कॉफी बिफी..." ती
रागात येऊन म्हणाली...."
हेहे अगं वेडाबाई.....मी खेचत
होतो तुझी...हे
धर कॉफी....मी
तुझ्यासाठीच केली आहे...."
तिने त्याच्याकडे पाहिले...मग
कॉफी कडे....त्याने
coffee mug समोर धरला....तसा तिने
पटकन तो कप घेतला आणि
पळत सुटली....अर्णव
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे
पाहत होता... असाच
2-3 दिवस त्रास नक्की
देयचा...मनाशी तो
हसला आणि खाली
बसून कॉफी पिऊ
लागला...
सकाळचे 9 वाजत आले...रविवारची सकाळ असल्याने
सगळे निवांत होते...
सौरभ आळस देत बाहेर आला....काकुंनी टेबलं वर
चहा आणि नास्ता
आणून ठेवला होता....
मोहन तिथेच घुटमळत
होता...त्याची हालचाल
पाहून काकांनी त्याची
बिस्किटे आणि दूध
आणून ठेवले आणि
मोहन जिभल्या चाटत
ते संपवु लागला....जीवना समोरून
चालत येत होती....अर्णवने तिच्याकडे पाहिले
आणि बाबाना विचारले...."
ही मुलगी मुक
बधिर आहे काय...".."
ए, तुला काय
मी मुक बधिर
दिसते का ?" जीवनाचा
राग अनावर झाला...."
नाही म्हणजे कालपासून
तु काही बोलली
नाहीस ना...मला
वाटले काय म्हणजे
...ना.." " मी
खूप बडबड करते...पण काल
मी चुकून तुला
सेल्समन बोलले ना
तेव्हा..."..." हा, म्हणजे
तु आंधळी पण
आहेस तर..." अर्णव
टाळी देत बोलला...."
ए मी एकदम व्यवस्थित आहे समजले
का..." आणि दोघांचे
भांडण सुरू झाले....दोघांना आवरता आवरता
काका काकूंना नाकी
नऊ आले....सौरभ
तर दोघांची मजा
बघत हसत होता
जसे काही TV वर एखादा
comedy शो च चालू
आहे....
शेवटी ती रागारागाने
पाय आपटत आत निघून गेली...."
अरे का रे तिला त्रास
देतोस....बघ आता
तिने नास्ता पण केला
नाही... " काकू अजीजीने
म्हणाल्या..." अगं जाऊदे
ना...तसेही व्यायाम
नीट करत नाही...वजन वाढतेय...करू दे
जरा डाएट..." तो
हसत म्हणाला.....काका
काकूंना काही संदर्भ
लागेना....शेवटी जाऊदे
असं म्हणत काकु आपल्या
कामाला गेल्या आणि
काका बाहेर पडले....सौरभ फुटबॉलच्या
प्रॅक्टिसला लागला....आणि आजी जप करण्यात
मग्न झाली... अर्णव
गालातल्या गालात हसला
आणि तिथेच बसून newspaper
वाचण्यात गुंग झाला...
तेवढ्यात आतून kitchen मधून भांडी
पडल्याचा आवाज आला...काका आणि
अर्णव धावत आत आले....समोरचा
दृश्य पाहून अर्णव
तर हसून गडाबडा
लोळायला लागला...समोर
जीवना उभी होती..अंगावर संपूर्ण
पीठ पडले होते...हात, तोंड
सगळं पीठाने माखलेले....एक हातात
झारा आणि एक हातात लाटणं
असा तिचा अवतार
होता....समोर काकू
हाताने तिच्या अंगावरील
पीठ झटकत होत्या..."
अरे काय प्रकार
आहे हा..?" काका
म्हणाले..." अहो, मी
चकल्या करत होते...तेवढ्यात जीवना आली
आणि तिने माझ्या
हातातून झारा काढून
घेतला आणि काम चालू करणार
इतक्यात तिच्या हातून
भांडं पडले...."....आता
काकांना पण हसू आवरेना ...आणि दोघं
टाळ्या देत देत हसू लागले....
“काकूऊऊऊउ ...बघा ना....”असा रडवेला
आवाज काढत जीवना
डोळे पुसत खोलीत
निघून गेली...." अरे
अर्णव काय चालू
आहे...तिला सारखे
तु टोचून बोलत
असतोस...रडवेली झालीये
बघ आज ती...जा तिला
समजावं...पोर बिचारी
ती...." काकू ओरडत
म्हणाल्या...अर्णव तसा
हसू आवारात तिच्या
मागे गेला...तिने
जोरात खोलीचे दार
आपटले...’बापरे...एवढा राग....आज काय
खरं नाही’....अर्णव
मनात बोलला....थोड्यावेळाने
येऊ असा विचार
करत तो निघून
गेला....
2 तास झाले....3 तास...अजून
काही जीवनाने दार
उघडले नव्हते...सगळ्यांना
काळजी वाटायला लागली.."पोरीने खूपच
मनाला लावून घेतले
वाटते....अहो जरा
बघा ना...."काकू
म्हणाल्या... काका म्हणाले,
"मी का बघू...अर्णवने गेले 2 -4 दिवस
तिला खूप त्रास
दिलाय... ती बागकाम
करत असताना रोपच
काय लपवून ठेवतो....मोहनला तिच्या
अंगावरच काय सोडतो...तिची योगाची
चटईच परवा लपवुन
ठेवली...बिचारीने गवतावर
बसून थंडीत योगा
केला....अजून सर्दी
नाही गेली तिची...
त्यानेच काय ते समजवावे तिला..."काका
म्हणाले...हुम..खरंय...आपण जरा
जास्तच त्रास दिला
तिला....एक तर आम्ही एकमेकांना
ओळखत नाही आणि
त्यात तिला एवढा
त्रास देणे बरोबर
नाही....तो उठला आणि तिच्या
खोलीकडे जाऊ लागला...त्याने दार
ठोठावले....मी आहे
अर्णव...दार उघड प्लीज...त्याने विनवले...."
मी नाही उघडणार...आतून रडवेला
आवाज आला.." बापरे
म्हणजे ही अजून रडत आहे
तर....आता अर्णवला
राहवेना...बाहेर येऊन
त्याने त्या खोलीच्या
खिडकीचे दार उघडले
आणि तो आत आला....आतमधले
दृश्य बघण्यासारखे होते....पूर्ण खोलीभर
पसारा मांडला होता...कदाचित चिडचिड
करून सगळे कपडे
तिने इकडे तिकडे
पसरवले होते,.... बेडवरचा
टेड्डी खाली पडला
होता...उश्या आणि
पांघरून पसरले होते...आणि ती
समोर लॅपटॉप वर
बसून skype वर कोणाशी
तरी बोलत होती...डोळ्याला रुमाल लावून
आणि मध्ये मध्ये
नाक पुसत ती बोलत होती....अर्णवला असे खिडकीतून
आलेले पाहून तिने
लॅपटॉप बंद केला...आणि त्याला
ओरडायला त्याच्याकडे धावली...."
आज तुझ्यामुळे मी
रडले..." तिने एक
बोट त्याच्याकडे रोखून
रागात बघितले....
आज हिचा हात
पकडावा आणि तो पण कायमचा....
अर्णवची इच्छा झाली...पण त्याने
स्वतःला सावरले....आणि
आपले दोन्ही कान
पकडून उठा बश्या
काढायला सुरवात केली...
हा हा हा...ये हुवी
ना बात....जीवना
मनसोक्त हसत होती....1...2...3...4....20...25....
कॉउंटस करत होती....
तिचे ते हसणे आज तो
पहिल्यांदा पाहत होता....त्यामध्ये आपण किती
उठाबशा काढल्या त्याचे
त्याला भान राहिले
नाही...." बास बास
बाई ...जीव घेते
का आता..." तो
अजीजीने म्हणाला तेव्हा
कुठे तिचे समाधान
झाले....तो उठला आणि खोलीची
काडी काढायला निघाला..."
परत करशील का
असं..." ती म्हणाली...त्याने काडी
उघडली...." उम्म, उठाबश्या
काढायला काही मला
आवडत नाही...पण
त्या जर तुला त्रास दिल्याबद्दल
काढाव्या लागणार असतील
तर y not ..."....तो म्हणाला..."
हां.." ती हुंकारली...."
काय काय बोललास...?"
आणि युद्ध परत
सुरू झाले....तो
पुढे ती मागे....कधी तिच्या
हातात झाडू तर कधी लाटणे....त्याने बागेत
लपवलेले रोपटेच तिने
त्याला फेकून मारले
आणि एकदाचा तो
पडला..... ते रोप
बागेत लावल्यावर त्याची
ह्या युद्धातून सुटका
झाली...
दिवाळी जवळ येत
होती...तसं तसं घरचं वातावरण
अजुनच छान होतं
होतं...आज काय चकली....उद्या काय
लाडू....परवा रांगोळीची
तयारी...आकाशकंदील आणि
डेकॉरेशन ची तयारी....नवीन कपड्यांची
खरेदी आणि दिव्यांची
आरास....सगळं मनासारखा...
म्हणता म्हणता दिवाळी
उद्यावर आली...." आली
दिवाळी उद्या सकाळी..."
सौरभ नाचत होता...एकीकडे सर्वाना
मदत करत होता...
अर्णव आणि जीवनाकडे
आकाशकंदील लावायचे काम दिले
होते...." अरे नीट
स्टूल धर ना...मी पडेन...."
जीवना ओरडली.. " तुला
चढायला कोणी सांगितलंय...एक तर
5 फूट ...त्यात एवढा
उंच कंदील लावायचं..."...अर्णव बोलला..."
एय, तुला काय
रे हां.....5 फूट
काय आणि 5.9 काय..सेम च
आहे...कळलं का..."...."
बाई तु बरं झालं
इथे नाही शिकलीस
ते...युनिव्हर्सिटी बंद
पडल्या असत्या आणि
अभ्यासातून गणित हा
subject बंद
करावा लागला असता..."
दोघांचे सुसंवाद चालले
होते....शेवटी एकदाचा
आकाशकंदील लावुन झाला...
जीवना आनंदाच्या भरात
स्टूल वरून उतरणार
तेवढ्यात तिचा पाय
घसरला आणि ती पडणार तेवढ्यात
अर्णवने तिला अलगद
झेलले.... आज पहिल्यांदा
दोघांनी एकमेकांच्या
डोळ्यात पाहिले....एखाद्या
फिल्मी स्टोरी सारखे
दृष्य होते.. आणि
तसेच दोघांचे हाल
पण...एक अभिज्ञ...हवाहवासा भास...हो
भासच...आपण स्वप्न
तर नाही बघत
ना.....स्वप्नच आहे
हे तर...एवढे
सुंदर....एवढे छान...आवडलेले...मनापासून स्वीकारलेले... " अरे
झाला का नाही कंदील लावुन..का अजून
भांडतच आहेत दोघे..."
काकांच्या आरोळीने दोघं भानावर
आले.... जीवना एक्दम भानावर आली आणि तिने पटकन खाली
उडी मारली आणि
पळ काढला....'कल्टी
मारण्यात ही पटाईत
आहे बाबा...कळलं
ना की आता आपण पकडले
गेलो आहोत की बरोबर कल्टी
मारते'...अर्णवने डोक्यावर टपली
मारली आणि एक गोड smile दिली... डोक्यात
tune वाजायला लागली.." तुझे देखा
तो ये जाना सनम...प्यार
होता है दिवाना
सनम..." हायला....हे तर फुल फिल्मी
झाले.... आता काही
खरं नाही...पण
एक मिनिटं, मला
ज्या भावना आहेत
त्या तिला पण आहेत का...
काही कळतंच नाही
बुवा...ही पळूनच
जाते लगेच.... काय
करावं...कसं करावं...
अर्णव तिथेच खाली
बसला...एक विचारात....सुंदर अश्या
स्वप्नात....
"आली दिवाळी....उद्या सकाळी....हो ना
जीवना ताई....किती
मजा...."...जीवना स्वतःच्याच
तंद्रीत होती.... सौरभने
तिला हलवून जागे
केले..." आ...हो
रे...आली दिवाळी...."
जीवना विचारात बुडून
म्हणाली...किती पटकन
दिवस गेले...आता
इथे राहून सुद्धा
2.5 महिने झाले....आणि माझे
US ला जायचे दिवस
पण जवळ आले....3
महिने व्हिसा होता...दिवाळी नंतर
सन्मानचा निरोप घेणार...
आणि आणि त्याचा
पण...परत भेटू
नाही भेटू खरंच
माहिती नाही... त्याला
भेटून फक्त 15 च
दिवस झाले पण असे वाटले
की आम्ही अनोळखी
नाहीतच मुळी...त्याचे
चिडवणे...सतत त्रास
देणे...थट्टा करणे....आणि तिला
राग आला की उठाबशा काढणे....
तिच्या डोळ्यात डोळे
घालून खोलवर पाहणे
आणि हलकेच हसणे...
नाश्त्याच्या टेबलं वर
समोरच येऊन बसणे
आणि सर्वांच्या नकळत
हळूच डोळा मारणे...
सकाळी योग झाला
की समोर एक कॉफी मग
दिसायचा.... त्यावर दोन
teddy हातात हात घालून
बसलेले चित्र असायचे...तिच्या नकळत
कॉफी तिथे आणून
ठेवणे..... सौरभ कडून
चिट्ठ्या पाठवणे आणि
तिला संध्याकाळी तिथे
भेटून बोलणे... काका
काकुंसोबत सुरू केलेला
night walk ...हाहा सगळं अजबच....रोजचा दिनक्रम
झालेला... आणि काल मात्र
तो वेगळाच भासला....काळजी घेणारा....आपलासा... तिचे तिलाच कळले नाही
काय होत आहे...काय झाले
आहे...पण झाले आहे हे
नक्की....
एकीकडे तो
पायऱ्यांवर बसून शांत
विचारात गढलेला आणि
एकीकडे जीवना सगळ्यांमध्ये
असुन एकटीच विचारात
बसलेली... मौसम पण
बदलत होता.... हळुवार
थंडीने सर्वाना घेरले
होते... इथे मात्र
दोघांच्या हृदयात आग
बरोबर लागली होती...
थंडीमध्ये सुद्धा उब
देणारी ती आग त्यांना हवीहवीशी वाटत
होती..
वसुबारस झाली...धनत्रयोदशी
झाली....रोज फटाके
आणि फराळ....सगळ्या
नातेवाईकांना भेटणे बोलणे...आणि खुप
साऱ्या गप्पा.....खुप
महिन्यांनी अर्णव आल्यामुळे
घरी पाहुण्यांचा तर
खुपच लोटा येत
होता... सगळे नातेवाईक...मित्र-मैत्रिणी,
जवळचे लोक येऊन
आवर्जून भेटून जात
होते... दिवाळी सणच
असा आहे की तोच सर्वाना
एकत्र आणतो....सन्मान
आज दिव्यांनी आणि
लोकांनी भरून गेला
होता... आज खरे चैतन्य आले
होते.... काका-काकु
धावपळ करत होते....मनापासून सर्वांच्या फराळाचे
बघत होते... आजी
आणि सौरभ सर्वाना
हातभार लावत होते...अर्णव तर
1 मिनिट सुद्धा लोकांच्या
घोळक्यातून बाहेर येत
नव्हता..सर्वांनी त्याला
घेरले होते.... " अरे
ही कोण नवीन
मुलगी....अर्णव, US मधून पटवून
आणलीस की काय
?" रोजचे सर्वांचे प्रश्न....आणि
त्यावर हशा ठरलेला...."
आता काय सांगावं..
US मधूनच आलेली पोरगी
पण सन्मान मध्ये
येऊन पटवली आहे...."
अर्णव मनातल्या मनात
बोलायचा आणि हलकेसे
हसायचा....सन्मानाचे वातावरण बदलत
होते हे नक्की
आणि हा बदल सगळ्यांच्या लक्ष्यात येत
होता.. फक्त कोणी
न बोलता " होऊदे
त्यांना होयचे आहे
तसे" असा म्हणून
लांबूनच मजा घेत होते....
आज लक्ष्मीपूजन होते.... काका
काकु आणि जीवना
नि सगळी तयारी
केली होती.... सन्मान
आज खऱ्या अर्थाने
मंगलमय वाटत होता....
सर्वजण पहाटे 4.30 वाजता
" दिवाळी पहाट" ला जाऊन आले होते...
शास्रीय संगीत आल्यामुळे
सर्वांचे मन तृप्त
झाले होते.... सर्वांची
घरामध्ये जोरदार तयारी
चालू होती... संध्याकाळी
जीवना साडी नेसणार
होती....काकुंची पैठणी.....गुलाबीसर रंगाची आणि
पदरावर मोर..कितवा
काठ....रेशमी जर....
साडी नेसायची प्रॅक्टिस
खुप आधीच झाली
होती... त्यामुळे त्यावरचे
मॅचिंग दागिने....मेकअप
सगळ्याची आधीच तयारी
झाली होती....आज
जीवना खुप खुश होती...
तिने सौरभला हाक
मारली...सौरभ माझे
एक काम करशील?
तुझ्या दादाला जाऊन
सांग की आज संध्याकाळी एक छान
surprise आहे म्हणुन.."...सौरभ ने
अर्णवला निरोप दिला...ओह म्हणजे
आज जीवना चा
काहीतरी प्लॅन आहे
तर...अर्णव म्हणाला,
" तिला सांग की
मी आज संध्याकाळी
नाहीये... मित्रांसोबत बाहेर जाणार
आहे आणि उशिरा
घरी येईन..."...सौरभ
ने जीवना ला
निरोप दिला.." कसला
माणुस आहे...घरचा
लक्ष्मीपुजन सोडून हा
आज काय बाहेर
जाणार आहे?"..."त्याला
सांग की आज तुला थांबावे
लागेल..घरची पुजा
आहे.." जीवनाने
निरोप दिला...." नाही
माझा आधीच प्लॅन
झाला आहे आणि मी जाणारच
आहे..."... " पण मग
पुजा बघुन तरी
जा..." " नाही ग,
माझे दिवस प्लॅन
झाले आहेत आणि
त्यानुसार नाही झाला
तर पुढचा सगळं
गडबडेल..." सौरभ इकडून
तिकडे निरोप देयचे
काम देऊन कंटाळला....शेवटी दोघांना
एकमेकांचे फोन नंबर
देऊन " आता खेळा
SMS SMS " असा म्हणत
वैतागून निघून गेला....
आता कोणी कोणाला
message करायचा....अर्णव नेहमीप्रमाणे
थट्टेच्या मूड मध्ये
आला....आज मी नाहीच
message करणार..त्याने ठरवले...इकडे जीवनाला
भयंकर राग आला होता....तिच्या surprise ची
पूर्ण वाट लागली
होती....तिची धुसफूस
सुरू झाली....
संध्याकाळी ती साडी
नेसुन तयार झाली....काकुंनी तिला छान
तयार केले होते...काकु आणि
आजीनी पण जरीच्या
साड्या नेसल्या होत्या....काका आणि
सौरभ झब्ब्या मध्ये
होते....पण तिचे डोळे अर्णव
ला शोधात होते...पण तो
कुठे दिसत नव्हता...
ती सुन्न झाली...खरंच म्हणजे
आज हा नाहीये...ती गप्पं
झाली आणि एक खुर्चीमध्ये बसुन राहिली..."
काय झाला ग...बरं वाटत
नाहीये का? " आजीने
जवळ येत तिच्या
चेहऱ्यावरून हात फिरवला...."
नाही आजी..असा
काही नाही...बस
आज मुड नाहीये.."
" हुंम, मला माहितीये
का मुड नाहीये
ते.." आजी हसत
हसत म्हणाल्या...." चल,
आपण पुजेची तयारी
करू..." असा म्हणत
त्यांनी तिला ओढतच
आत नेले... काका
पुजेसाठी बसले होते...काकु त्यांना
तयारी करून देत
होत्या.... आजीनी आरतीचे
ताट तयार केले
आणि आरतीला सुरवात
झाली.... " ह्याने असे
का केले...." जीवना
आपल्यात विचारात होती..तेवढ्यात तिच्या पाठीवर
अलगद एक हाथ पडला... " काकु मला
नका समजाऊ...माझा
मुड नाही" तिने
सांगितले..." तुझा मुड
ठीक करायला तर
आलो आहे मी.."
" अर्णववव ..." तिने जोरात
हाक मारली...अर्णवच्या
मागे दोघं जण उभे होते...तिने अर्णवच्या
मागे पाहिले...." आई
बाबा.."...ती आ
वासून बघत होती...काका पुजा
करता करता थांबले...काकु तिथेच
थबकल्या...सौरभ आनंदाने
टाळ्या वाजवू लागला
आणि मोहन ने भो भो
करून स्वतःभोवती फेऱ्या
मारल्या.... सगळ्यांना ठाऊक होते
तर हे.....जीवना
ने एकवार सगळ्यांकडे
पाहिले.... अर्णवच्या हातात त्यांच्या
बॅग होत्या.....जीवना
च्या डोळ्यात अचानक
पाणी आले आणि तीने
आई बाबांना जाऊन मिठी
मारली....आईने प्रेमाने
तिच्या डोक्यावरून हात
फिरवला.....काका काकु
त्यांना भेटले...आजी
जीवना आणि अर्णव
पाशी आली आणि तिने दोघांचा
हात एकमेकांच्या हातात
दिला...आणि हळूच
डोळा मारला....आणि
घरात एक्दम हशा
पिकला..आता हळू हळू सगळा
उलगडा होत होता...आज सन्मान
आनंदाने नाहून निघाला
होता....घरामध्ये लक्ष्मीने
प्रवेश केला होता
आणि सन्मानचा मान
वाढला होता....
पुजा अर्चा संपवून
सर्वजण हळु हळु बाहेर पडू
लागले....जीवना बाहेर
पडणार तेवढ्यात अर्णवने
तिचा हाथ पकडला...तिने चमकुन
त्याच्याकडे पाहिले.... " आज कोणीतरी
खूप सुंदर दिसत
आहे..हुं, हे
surprise होते तर.." ती लाजली..
आणि तिने त्याच्या
खांद्यावर अलगद डोके
ठेवले...." आज जर
तु आला नसता ना
तर मी आजच बॅग भरून
US ला निघाले असते..."
जीवना म्हणाली.." तो
हसला....आणि तिच्या
केसांवरून अलगद हात
फिरवत तिला म्हणाला
." तुला एकटीला बरे
जाऊन दिले असते....मी पण
आलो असतो सोबत...आता सोबतच
सगळा आयुष्य काढायचे
आहे..."
दिवाळी नंतर लगेचच
त्यांचा साखरपुडा झाला....अर्णवची नौकरी आणि
जीवनाने PHD ला admisison घेतली की
साधारण 1- 1 1/2 वर्षाने लग्न करायचा
निर्णय पक्का झाला....
15 दिवसांनी......सकाळची 9 ची वेळ...आज आई
बाबा आणि हे दोघं ही
US ला जायला निघाले
होते.. बॅग pack झाल्या
होत्या.. कालपर्येंत गोंधळ गडबडीत
असलेले घर आज एकदम शांत
शांत वाटत होते...
काका काकुंनी आई
बाबांचा निरोप घेतला....जाताना हे
न्या सोबत ते न्या असा
करत 2 बॅग जास्तीच्या
वाढल्या होत्या......आज
काय सॉल्लिड शांतता
आहे...काका ना राहवून म्हणाले...आणि घरात
एकाच हशा पिकला...."जीवना तु
आम्हाला तुझ्यासारखे
बनवून जात आहेस..तुझी सवय
झाली आता.. वेळ
नाही जाणार आमचा..."
काका म्हणाले...आणि
सगळीकडे शांतता पसरली...
" काका अहो कश्याला
tension घेता...आम्ही ना
एक भन्नाट प्लॅन
केला आहे...अर्णव
1-2 वर्ष नौकरी करेल,
तोपर्येंत माझा शिक्षण
पूर्ण होईल...आणि
मग आम्ही इथेच
येऊन राहणार...अर्णव
तुमचा business सांभाळेन आणि मी प्रोफेसर होईन...आणि
सन्मान मध्ये सन्मानाने
आपण राहू..." त्यांचे
विचार ऐकून सर्वाना
समाधान वाटले.." आणि
काय आहे ना डोक्याला शॉटच नाही
लावून घेयचा....1-2 महिन्यांनी
सॉल्लिड ट्रीप काढायच्या..
खूप सारे सेल्फी
काढून फेसबुक वेळ
टाकायचे आणि बस..खूप हुंदडायचे...मोहनला घर
सांभाळायला देयचे.. तसं कोणी
आलेच घरी की आहेत 14 इंजेकशन्स..." घरी
एकच हशा पिकला....
चहा नास्ता करून
सर्वजण बाहेर आले...
बाहेर येत येत काकु अर्णवला
म्हणाल्या... " मग? कशी
चॉईस आहे माझी..?"
अर्णवने जीवना कडे
पाहिले....ती त्याच
वेशात होती, जसे
त्यांनी तिला पहिल्या
दिवशी पाहिले होते...3/4 jeans, काळा T - shirt , जॅकेट
आणि हूड घेतलेले....पाठीवर सॅक.. जॅकेटच्या
कप्यांमधल्या खिशात हात
घालून खिशामधले दाणे
ती खात उभी होती....." कोण ही
कार्टून !!! तुझी चॉईस....काय आई....काय गळ्यात
मारलाय माझ्या..." आणि
पोट धरून तो हसू लागला..."
काय काय बोललास
?" जीवना जवळ
येत म्हणाली..." काही
नाही अगं...आई
ला म्हणालो, चल
येतो आता ह्या
कार्टूनला घेऊन.."
" काययययययय...." आणि ती
त्याला मारायला निघाली...दोन्ही कान
पकडून सॉरी सॉरी
करत तो पुढे पळत होता
आणि जीवना त्याच्या
मागे....लांबुन दोन्ही
आई बाबा हे दृश्य बघत
होते आणि पुढची
स्वप्न रंगवत होते....
आज सन्मानला खऱ्या
रूपाने नवं " जीवन"
मिळाले होते....."जीवना"
नावाने..
This blog is dedicated to my sweetheart sister_Manali...
Her character is very much resembled to my blog character " Jeevana_ sarvana jeevan denari.." and her nature inspired me alot to write this blog...Thanks for reading and loving my blogs...Lotz of Love...
मिताली कुलकर्णी
19 July 2016